दुबईत क्रिकेट विश्वातील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने पराभूत केले. या विजयासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2021 च्या T20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. सुरुवातीला फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला 20 षटकांचा खेळही पूर्ण करता आला नाही. 147 धावांवर अख्खा पाकिस्तान संघ बाद झाला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून केएल राहूल आणि रोहित शर्माला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तान (प्लेइंग XI): बाबर आजम (कप्तान), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रऊफ, शाहनवाज दहानी
भारत (प्लेइंग XI): रोहित शर्मा (कप्तान), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
भारताने घेतला 2021 च्या पराभवाचा बदला, पाकिस्तानला 5 विकेटने चारली धूळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -