ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : आलिशान मोटारीतून बोकड आणि शेळ्यांची चोरी करणाऱ्या चौघांची टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीकडून १६ बोकड, शेळ्या व गुन्ह्यातील आलिशन मोटार, असा सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
शिवाजी पांडूरंग कुंभार (वय ३८ रा. कनाननगर) असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. तर किशोर नागाप्पा गायकवाड (उजळाईवाडी, ता. करवीर), दिपक शिवाजी गायकवाड (रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) आणि राजू बागल (रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा), अशी पसार असलेल्या संशयित साथीदारांची नावे आहेत.
कोल्हापूर ; बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -