आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) दुबईत झालेल्या हाय होल्टेज लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानला (India Beat Pakistan) चांगलीच धूर चारली. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाने बदला घेतला. हार्दिक पांड्यासह भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तान संघाला 20 षटकांचा खेळही पूर्ण करता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी 147 धावांवर अख्खा पाकिस्तान संघ गुंडाळला होता. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून केएल राहूल आणि रोहित शर्माला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
भुवनेश्वर कुमारने रचला विजयाचा पाया…
आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या भुवनेश्वर कुमारने अपेक्षीत कामगिरी केली. भुवीने सुरुवातीच्या ओव्हरमध्येच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (10) याला आऊट केले. त्यानंतर स्लॉग ओव्हरांत आणखी तीन विकेट आपल्या नावावर नोंदवले. भुवीने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 4 विकेट घेतल्या.
हार्दिक पांड्याची ऑलराउंडर जादू चालली…
हार्दिक पांड्याची ऑलराउंडर जादू या लढतीत दिसून आली. हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करून त्याने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याने मिडल ओव्हरमध्ये पाकिस्तानला तीन जबरदस्त झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. पाकिस्तानचा अख्खा संघ 147 धावांवर तंबूत परतला.
दुसरीकडे, टीम इंडियाला देखील पाकिस्तानी गोलंदाजांनी दबावात आणले होते. परंतु हार्दिक पांड्याने शानदार आणि संयमित फलंदाजी करून टीम इंडियाला विजयपथावर आणले. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने चौकार आणि षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिकने 17 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकारच्या मदतीने 33 धावा केल्या आणि प्लेयर ऑफ द मॅच म्हणून त्याचीच निवड झाली.
विराट कोहलीने सांभाळला पहिला हाफ
विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. परंतु करियरचा 100 वा टी-20 सामना खेळत असलेल्या कोहलीला पहिल्याच षटकात फलंजादीसाठी मैदानात उतरावे लागले. विशेष म्हणजे तो 10 व्या ओव्हरपर्यंत क्रीजवर होता. त्याने 34 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकारच्या मदतीने 35 धावा केल्या. या दरम्यान त्याने आकर्षक शॉट्स लगावले. चाहत्यांचं मन जिंकून घेतले.
रवींद्र जडेजाने दिले महत्त्वपूर्ण योगदान
टीम इंडियात दूसरा ऑलराउंडर म्हणून लेफ्टआर्म स्पिनर रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली होती. जड्डूने पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 11 धावा दिल्या. तसेच जबरदस्त फलंदाजी देखील केली. जडेजा अंतिम ओव्हरमध्ये बोल्ड झाला परंतु त्याने हार्दिकला उत्तम स दिली. 5 व्या विकेटसाठी जडेजा आणि हार्दिकने 51 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. जडेजाने 34 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारच्या मदतीने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दिनेश कार्तिकनेही दाखवला जलवा
पाकिस्तानविरुद्धच्या लढतील ऋषभ पंत नाही तर दिनेश कार्तिकला संधी देण्यात आल्याचे कर्णधार रोहित शर्माने लढत सुरू होण्याआधी स्पष्ट केले होते. दिनेश कार्तिकने तीन महत्त्वपूर्ण झेल घेत आपला जलवा दाखवला. त्याने बेस्ट झेल घेण्याचा अवॉर्ड देखील पटकावला.