इंटरनेट यूजर्ससाठी मोठी बातमी आहे. येत्या दिवाळीपर्यंत दिल्ली-मुंबईत Jio 5G सेवा सुरु होईल अशी घोषणा रिलायन्स जिओने केली आहे. रिलायन्सच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 5 जी सेवेमुळे आता यूजर्संना अधिक वेगवान इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे. इंटरनेटची स्पीड वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवयासांना देखील गती येईल.
5 जी सेवेची घोणा करताना अंबानी म्हणाले की “रिलायन्स जिओचा 5G स्पेक्ट्रम फिक्स्ड ब्रॉडबँड सेवेसाठी वापरला जाईल. रिलायन्स जिओ दूरसंचार उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ही 5G सेवा सुरू केल्यानंतर Jio 5G हे देशातील सर्वात मोठे नेटवर्क असेल. या दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर 2022 पर्यंत दिल्ली-मुंबईमध्ये 5G सेवा दिली जाईल”. तसेच ते म्हणाले की, “रिलायन्स जिओ ही देशातील नंबर-1 डिजिटल सेवा प्रदाता आहे आणि सध्या प्रत्येक 3 पैकी 2 घरे जिओ फायबर वापरतात”.
मुकेश अंबानी म्हणाले, या दिवाळीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक प्रमुख शहरांमध्ये Jio 5G लाँच करेल. त्यानंतर काही महिन्यात Jio 5G चा प्रसार वाढवला जाईल. डिसेंबर 2023 पर्यंत Jio 5G आपल्या देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक तालुक, प्रत्येक तहसीलमध्ये वितरित केले जाईल.
RIL ही भारतातील सर्वात मोठी करदाता
मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी करदाता आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील काळात 2.32 लाख नोकऱ्या दिल्या आहेत. यावरून रिलायन्स समूह देशाच्या विकासात मोठे योगदान देत असल्याचे दिसून येते. यामध्येही रिलायन्स रिटेलने सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत. RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सर्व शेअरधारक, सहयोगी, अधिकारी आणि भागीदारांचे स्वागत केले आणि हा प्रसंग खूप खास असल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षी ही एजीएम फिजिकल स्वरूपात होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.