ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस राजासारखा साजरा करावा असे सत्ताधाऱ्यांना वाटू लागले आहे. तर भारतात चित्ते कधी आणावेत याचा दिवस देखील राजाच्या वाढदिवसा दिवशी निवडला जातो. त्यावरूनच देशात राजेशाहीला सुरुवात झाली आहे. असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्पावरून शेलारांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आशिष शेलार यांचे १० टक्के हे वक्तव्य हे जर सत्य असेल तर महाविकास आघाडीवरील लोकांचा विश्वास उडेल. त्यामुळे सत्य काय आहे समोर यायला हवं, असे ते म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोयाबीन सह पावसाळी पिकांचे मोठ्या रामनाथ नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर ७० ते ८० टक्के नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेले ८ चित्ते कुनो अभयारण्यात मोदींच्या हस्ते सोडण्यात आले. देशात असा एक कार्यक्रम राहिला नाही ज्याचा मोदींनी इव्हेन्ट केला नाही. काल देशात चित्ते आणले त्याचा देखील इव्हेट पंतप्रधान मोदींनी केला, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. तसेच देशात माणसापेक्षा प्राण्याला महत्व आलं आहे. त्यामुळं माणसांनी माणसांनी याचा विचार करावा, असेही ते यावेळी म्हणाले.