Saturday, July 5, 2025
Homeसांगलीमिरजेत पान टपरी फोडल्याच्या कारणातून तरुणाचा खून

मिरजेत पान टपरी फोडल्याच्या कारणातून तरुणाचा खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेतील स्टेशनरोड येथे पानपट्टी ची तोडफोड केल्याचा संशय घेऊन लाथाबुक्याने छाती,पोटावर,गुप्तांगावर मारून एकाची निर्घृणपणे हत्या

मिरजेतील स्टेशनरोड येथे पानपट्टी ची तोड फोड केल्याचा संशय घेऊन एकाला बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेतील स्टेशनरोड वरील मारुती मंदिराजवळ पानपट्टी ची तोडफोड केल्याचा संशय घेऊन गणेश खन्ना नायडू रा रेल्वे स्टेशन झोपडपट्टी मिरज याने जीलानी ईसामुद्दीन कुडचिकर वय 47 रा रेल्वे कोल्हापूर चाळ मदिना मोहल्ला मिरज यांना लथबुक्यांनी,पोटावर छातीवर आणि गुप्तांगावर आणि तोंडावर बेदम मारहाण केली होती, बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या जीलानी कुडचिकर यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना जीलानी कुडचिकर यांचा मृत्यू झाला आहे, याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांत त्यांचे भाऊ रब्बानी ईसामुद्दीन कुडचिकर वय 43 रा रेल्वे कोल्हापूर चाळ मदिना मोहल्ला मिरज यांनी फिर्याद दिली होती, याबाबत आता महात्मा गांधी चौक पोलिसांनी संशयित आरोपी गणेश खन्ना नायडू याला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत चा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -