Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : हद्दवाढ म्हणजे भारत-पाकिस्तान युद्ध नव्हे : मंत्री चंद्रकांत पाटील

Kolhapur : हद्दवाढ म्हणजे भारत-पाकिस्तान युद्ध नव्हे : मंत्री चंद्रकांत पाटील

शहराची हद्दवाढ हे काही भारत-पाकिस्तान युद्ध नाही. हा विषय बळजबरीने नव्हे तर समजस्याने, संवादाने मार्गी लावण्याची गरज असल्याची स्पष्टोक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

मंत्री पाटील म्हणाले, हद्दवाढप्रश्नी आपण अंगाला लावून घेत नाही, असे आरोप झाले तरी ठिक आहे. परंतू मी शुद्ध व्यवहारी आहे. वास्तवाचे भान ठेवून पुढील दिशा ठरवत असतो. हद्दवाढीबाबतही आपली हीच भूमिका आहे. ज्या गावांचा हद्दवाढीत समावेश करून घ्यावयाचा आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून होकार येत नाही.

तोपर्यंत हद्दवाढीचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. प्रस्तावित गावातील ग्रामस्थांची संवाद झाला पाहिजे. त्यांनी होकार दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. बळजबरीने निर्णय घेणे सोयीचे होणार नाही. हद्दवाढीची मागणी करणारया मनपातील नेत्यांनी प्रस्तावित गावात जावून हद्दवाढीविषयी असणारे ग्रामस्थांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपणही हद्दवाढीच्या जमेच्या बाजू सांगतो आपणही हद्दवाढीच्या जमेच्या बाजू संबंधितांना पटवून देतो. अदृश्य स्वरूपात काहींशी बोलून त्यांची समजूत काढतो. हद्दवाढ कशी फायदेशीर हेही त्यांना सांगतो. हद्दवाढ झाल्यास जमिनीचे दर वाढणार आहेत. सध्या ज्या सुविधा मनपात नसताना घेतात.

त्या मनपाच्या घटक झाल्यानंतर आणखी चांगल्या पद्धतीने मिळणार असल्याचेही त्यांना सांगत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. एकप्रकारे हद्दवाढीच्या बाजूचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतू ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांचे मत असल्याचे दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -