कोल्हापूरातील शेंडापार्क येथे तोफगोळे आढळले असून यामुळे परिसरात कुतुहल निर्माण झाले आहे. आढळलेले तोफगोळ्यांची तीन असून त्यांचा वापर युध्दात सामग्री संहारासाठी करण्यात येत असे असा कयास इतिहास संशोधकांनी बांधला आहे. या तिन्ही तोफगोळ्यांचे वजन एकूण 10 किलोच्या आसपास आहे.
इतर ठिकाणी आढळून आलेले हे तोफगोळे कोणीतरी शेंडा पार्क परिसरात आणून ठेवले असावेत. कारण त्या परिसरात कोणतीही इतिहासाशी संदर्भात घटना न घडल्याने तिथे असे तोफगोळे आढळू शकत नाहीत. सध्या हे तोफगोळे कोल्हापूर पुरातत्व खात्याकडे देण्यात आले असून लवकरच पर्यटकांना राजर्षी शाहू महाराज वस्तू संग्रहालयात हे तोफगोळे पाहता येणार आहेत.






