Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनमलायकाच्या शोमध्ये गेस्ट बनणार अरबाज खान-अर्जुन कपूर, समोर येतील अनेक रहस्य!

मलायकाच्या शोमध्ये गेस्ट बनणार अरबाज खान-अर्जुन कपूर, समोर येतील अनेक रहस्य!

मलायका अरोरा (malaika arora)ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी जेवढा वेळ पडद्यावर येते, तेवढा वेळ ती आपल्या अदांनी प्रेक्षकांवर छाप सोडून जाते. मलायका नेहमीच पर्सनल नात्यांवर मौन बाळगते. मात्र यावेळी तसे होणार नाही. मलायका तिचा शो अरोरा सिस्टर्स (arora sister show) OTT प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहे. या शोमध्ये त्यांचे पर्सनल नातेसंबंध असणारे लोक गेस्ट म्हणून येतील. यामध्ये त्यांच्या आयुष्याशी संबंधीत अनेक रहस्य उलगडणार आहेत.

अरोरा सिस्टर्स शोमध्ये होणार धमाका

बॉलिवूडच्या ग्लॅमरस बहिणी (Bollywood sisters) मलायका अरोरा आणि अमृता अरोरा (amruta arora) लवकरच त्यांचा नवा रिअ‍ॅलिटी शो घेऊन येत आहेत. हा शो डिज्नी प्लस हॉटस्टारवर येणार आहे. दोन्ही बहिणी मिळून हा शो होस्ट करणार आहेत. पण मोठी गोष्ट म्हणजे मलायकाचा एक्स-हसबंड अरबाज खान (Arbaaz Khan) आणि सध्याचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) या शोमध्ये सहभागी होणार आहे. मात्र हे दोघं एकत्र एकाच शोमध्ये दिसणार नाही. दोघेही वेगळ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. पण या शोच्या येणाऱ्या एपिसोड्ससाठी चाहते आधीच उत्सुक आहेत.

मलायका पुन्हा अरबाजसोबत दिसणार आहे

मलायका अरोराने 2016 मध्येच अरबाज खानपासून घटस्फोट घेतला होता. पण या घटस्फोटाची कटुता दोघांनी त्यांच्या नात्यात कधीच येऊ दिली नाही. याचे कारण त्याचा मुलगा अरहान होता. दोघेही आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेतात. या कारणामुळे, या एक्स जोडप्याने आपापसात मैत्री टिकवून ठेवली आहे. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज खानही जॉर्जियाच्या प्रेमात आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

प्रसिद्ध आहे मलायका आणि अमृताची जोडी

अशा परिस्थितीत, शो दरम्यान मलायका पुन्हा तिच्या एक्स-हसबंडसोबत एक स्टेज शेअर करणार आहे. अरोरा सिस्टर्स नावाच्या या शोमध्ये, मलायका आणि अमृताशी संबंधित अनेक लोक भाग घेतली. हा शो त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या थीमवर केला गेला आहे. बॉलिवूडच्या सर्वात मस्त सिबलिंग्समध्ये मलायका आणि अमृता यांची गणना केली जाते. दोघींचाही फॅशन सेन्स असो किंवा त्यांची बॉन्डिंग, चाहत्यांना त्यांच्याविषयी सर्वच गोष्टी आवडतात. त्या दोघी नेहमीच एकत्र पार्टी आणि व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत असतात.

अरोरा सिस्टर्सची वर्कफ्रंट

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या आयटम नंबरसाठी जास्त ओळखली जाते. तिने अनेक आयकॉनिक गाणी केली आहेत. जसे शाहरुख खानसोबत छैयान छैयान, अरबाज खानसोबत रंगीलो म्हारो ढोलना, सलमान खानसोबत मुन्नी बदनाम हुई… मलायकाने कोणतेही गाणे केले तरी ते हिट होणारच. मलायका आर्ट ऑफ लिव्हिंग आणि योगाला खूप सपोर्ट करते. अमृता अरोराबद्दल सांगायचे तर, ती सध्या इंडस्ट्रीत सक्रिय नाही, पण तिने कितने दूर कितने पास, आवारा पागल दीवाना सारखे चित्रपट केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -