ताजी बातमी ऑनलाईन टीम
200 कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिसाला मिळाला आहे. जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने तिला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्या महिनाभरापासून जॅकलिनची याप्रकरणी ईडीकडून (ED) चौकशी सुरु होती. याप्रकरणी ईडीने जॅकलिनला आरोपी करत कोर्टात पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले होते. अशामध्ये या प्रकरणाची आज सुनावणी झाली आणि कोर्टाने तिला जामीन दिला.
लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडकली आली होती. याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी तिला समन्स पाठवले होते. ईडीकडून जॅकलिनची सतत चौकशी सुरु होती. अशामध्ये या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीसाठी हजर झाली होती. कोर्टाने तिला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जॅकलिनला दिसाला मिळाला