Monday, February 24, 2025
Homeमनोरंजनऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

मणिरत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), विक्रम, त्रिशा कृष्णन आणि शोभिता धुलिया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात धुमाकूळ घालता आहे. रिपोर्ट्सनुसार, Ponniyin Selvan 1 हा जगभरात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आहे. हिंदी भाषेतही या फिल्मने चांगली कमाई केली आहे.

इतक्या कोटींची केली कमाई
पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने तामिळनाडूमध्ये पहिल्या दिवशी 25.86 कोटींचा बिझनेस केला आहे. ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयनबालन यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट आहे. पीएस 1 ओपनिंग डे वर 25.86 कोटींचा बिझनेस करणारा वर्षातील तिसरा बिग ओपनर चित्रपट ठरला आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, पीएस 1 हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला तमिळ चित्रपट आहे. यूएसमध्ये, चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 मिलियन डॉलर कमावले आहेत.

हिंदी बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
पीएस-1 च्या हिंदी व्हर्जन चित्रपटाचे पहिल्या दिवशी सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीत डब केलेल्या तमिळ चित्रपटाने एवढा पैसा कमावणे ही मोठी गोष्ट आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1995 च्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे ज्यामध्ये दक्षिणेतील एका पराक्रमी राजाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये दिसली आहे. तिने राणी नंदिनीसोबत राजकुमार पाजूवूर ही भूमिका देखील साकारली आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘विक्रम वेधा’ने केला एवढा बिझनेस
हृतिक रोशन (Hrithik Roshan)आणि सैफ अली खान (Saif Ali Khan)यांचा विक्रम वेधा (Vikram Vedha)हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे हृतिक बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या विक्रम वेधाने पहिल्या दिवशी जवळपास 11.25 चा गल्ला जमवला आहे. दरम्यान वीकेंडला विक्रम वेधा अजून चांगली कमाई करु शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -