ताजी बातमी ऑनलाईन टीम
कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोघा कैद्याकडे एक मोबाईल सापडला आहे. याप्रकरणी न्यायालयीन बंदी आकाश अनिल पसारे व मोका न्यायालयीन बंदी ऋषीकेश बाबासो चौगुले उर्फ गेंड्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंगाधिकारी भारत पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कारागृहातील सर्कल क्रमांक तीन व बॅरक क्रमांक एक मध्ये कैद्यांकडे झाडाझडती घेतली. यावेळी संशयित दोघा बंदीजणांनी आपल्या अंथरुणात लहान आकाराचा मोबाईल लपवून ठेवला होता. तो मोबाईल जप्त केला. कारागृह प्रशासनाने जुना राजवाडा पोलीसांकडे मोबाईल सपुर्द केला आहे. कारागृहाच्या सुरक्षेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापूर ; कळंबा कारागृहात मोबाईल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -