Wednesday, July 23, 2025
Homeआरोग्यडोकेदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष ठरू शकते हृदयविकाराचे कारण, वेळीच घ्या वैद्यकीय सल्ला!

डोकेदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष ठरू शकते हृदयविकाराचे कारण, वेळीच घ्या वैद्यकीय सल्ला!


जगात हृदयविकाराची समस्या गंभीर झाली आहे. अनेक जण या आजाराने ग्रस्त आहे. हृदयविकाराची समस्या ही अचानक उद्भवत नाही. चुकीची जीवनशैली आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या निर्माण होते. हृदयविकाराची समस्या निर्माण होण्याआधी आपले शरीर संकेत देत असते. असे अनेक संकेत आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हृदयविकाराला बळी पडतो. या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे डोकेदुखी
सामान्यतः डोकेदुखीची अनेक करणे आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डोकेदुखीची समस्या तुम्हाला हृदयविकाराचे संकेत देखील देते.

तुम्हाला अचानक डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ही समस्या महिनाभरात 8 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून असेल तर ही चिंतेची बाब आहे. ही मायग्रेनची समस्या असू शकते. मायग्रेन क्रॉनिक समस्येत उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तदाबाची ही समस्या हृदयविकाराच्या झटक्यापासून ते गंभीर नैराश्यापर्यंतच्या आजाराला कारणीभूत ठरते.

मायग्रेनचे आहे दोन प्रकार
मायग्रेनचे दोन प्रकार आहेत. पहिला प्राइमरी मायग्रेन आणि दूसरा सेकेंडरी मायग्रेन. सेकेंडरी माइग्रेन हा औषधींच्या साइड इफेक्ट किंवा इतर कोणत्या आजारामुळे होतो. तर प्राइमरी मायग्रेन प्रोटोटाइप असतो. ज्याचे कारण स्पष्टपणे लक्षात येत नाही.

यामुळे वाढते समस्या
मायग्रेनची समस्या निर्माण होण्यास आहार आणि आजूबाजूची परिस्थिती करणीभूत ठरते. महिन्यातून 8-15 दिवस डोकेदुखी होत असेल तर डोकेदुखीचे कारण शोधले पाहिजे. कॉफी, चॉकलेट, चीज, मशरूम, प्रक्रिया केलेले अन्न, आंबवलेले अन्न, जड अन्न, झोप न लागणे किंवा जास्त होणे, खूप उष्णता किंवा थंडी हे सर्व मायग्रेन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -