भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 40 षटकांत 8 विकेट गमावत 240 धावाच करता आल्या. पावसामुळे हा सामना 40-40 षटकांचा होता. दरम्यान या खेळी संजू सॅमसनने धमाकेदार खेळी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये देखील त्याने सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
63 चेंडूत 86 धावा करणाऱ्या संजू सॅमसनने शेवटच्या षटकात एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. मात्र या षटकात भारताला विजयासाठी 30 धावांची गरज होती. भारताकडून श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 50 धावा केल्या. सलामीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा नऊ धावांनी पराभव केला. पावसामुळे उशिरा सुरू झालेला सामना 40 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन संघाला सुरुवातीला धक्के देऊनही टीम इंडिया कमी धावसंख्येवर त्यांना रोखू शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 40 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या.
Ind Vs SA 1st ODI: संजू सॅमसनची धमाकेदार खेळी तरीही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 9 धावांनी विजय!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -








