ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : सुरत येथे मंगळवार (दि.११) पासून होणाऱ्या राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे व आदिती गायकवाड यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ क्रिकेट टी-२० संघात निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे.
शिवालीची यापुर्वी बंगळूरूतील १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली होती. त्यानंतर सलग वर्षे ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व व कर्णधारपदही भूष आह. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये तिने २०१३-१४ साली १ वर्षाखालील पश्चिम विभाग (भारतीय संघ) चे उपकर्णधारपदीही भूषविले. २०१९-२० मध्ये तिने भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक स्पर्धा व महिला आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली.




