गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट अजूनही तितके विस्तारलेले नसल्याने आजही पेट्रोल-डिझेल गाड्यांची मागणी कमी झालेली नाही. सध्या भारतात सणासुदीचे दिवस सुरु असल्याने या काळात ऑटो मार्केटलाही सुगीचे दिवस आलेले असतात..
भारतात दसरा-दिवाळीला मोठ्या प्रमाणात बाइक्सची खरेदी-विक्री होते. त्यामुळे जगातील सर्वात मोठी दुचाकीची बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. दसरा-दिवाळीनिमित्त सध्या दुचाकी शो-रुममध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.. सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या बाईकला भारतीयांची पसंती मिळाली, तसेच टाॅप-5 बाईक्सबाबत जाणून घेऊ या…
टाॅप 5 बाईक्स…
हिरो स्प्लेंडर
हिरो माेटोकाॅर्पची (Hero Motocorp) ‘हिरो स्प्लेंडर’ ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी बाइक ठरतेय. कमी किंमत, दमदार मायलेज व जोरदार परफॉर्मन्समुळे या बाइकला सर्वाधिक मागणी आहे. बाइकची किंमत 71,176 रुपये ते 75,176 रुपये (एक्स शो-रुम) आहे.
बाइकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचं इंजिन असून, ते 8 पीएस पॉवर व 8 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करते ही बाइक 65 ते 81 किमी प्रति लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
हिरो एचएफ डिलक्स
भारतातली ही दुसरी सर्वात लोकप्रिय बाइक ठरली आहे. या बाइकची किंमत 60,308 रुपये ते 65,938 रुपये आहे. या बाइकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचं इंजिन असून, ते 8.02 पीएस पॉवर आणि 8.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही बाइक 65 ते 70 किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
हिरो पॅशन प्रो
भारतात या बाईकलाही मोठी मागणी आहे. या बाइकची किंमत 74,408 रुपये ते 80,858 रुपये आहे. बाइकमध्ये 113 सीसी क्षमतेचं इंजिन असून, ते 9.15 पीएस पॉवर जनरेट करतं. ही बाइक 68.21 किमी प्रति लिटर मायलेज देते.
हिरो ग्लॅमर
भारतात 125 सीसी सेगमेंटमधली उत्तम बाइक आहे. हे इंजिन 10.84 पीएस पॉवर जनरेट करतं. ही बाइक 64.10 किमी प्रति लिटर मायलेज देते.
हिरो एक्स्ट्रिम 160 आर
परफॉर्मन्स बाइक्स सेगमेंटमध्ये या बाईकचा उत्तम पर्याय आहे. या बाइकची किंमत 1.19 लाख ते 1.30 लाख रुपये आहे. कंपनीने या बाईकमध्ये 163 सीसी क्षमतेचं इंजिन दिलं असून, ते 15.2 पीएस पॉवर जनरेट करू शकतं. ही बाइक 55.47 किमी प्रति लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीचे म्हणणं आहे.