ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई – शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धक्का देत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेना हे नाव आता दोन्ही गटांना वापरता येणार नाही. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे.
शिवसेनेच्या इतिहासातील या आजवरच्या सर्वात मोठ्या घडामोडींमुठ शिवसेनेवर मोठं संकट उभारलं आहे. या संकटात भाजप इतरही विरोधी पक्ष शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर टीका है न येतात. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट केला होता. त्यावेद त्यांना अटकही झाली. त्यामुळे, शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यातच, आता आमदार रवि राणा यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खासदार नवनीत राणा आणि मला १४ दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं, आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला, त्यामुळेच प्रभू श्रीराम यांनी उद्ध ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावून घेतले, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. हनुमानाने उद्धव श्राप दिलाय, म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसे विरोध केला, त्याचीच ही सजा त्यांना मिळाली आहे, असेही राणा यांनी म्हटले.