Friday, November 14, 2025
Homeकोल्हापूरवीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी अनिल स्वामी तर उपाध्यक्षपदी सदानंद हातेकर

वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी अनिल स्वामी तर उपाध्यक्षपदी सदानंद हातेकर

कोल्हापूरातील अग्रगण्य श्री वीरशैव को-ऑप बँकेचे अध्यक्ष पदी श्री अनिल स्वामी तर उपाध्यक्ष पदी श्री सदानंद हत्तरकी यांची निवड झाली. बँकेचे जेष्ठ संचालक श्री नानासो उर्फ विश्वनाथ शिवपाद नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. अध्यक्षपदी श्री अनिल मल्लय्या स्वामी यांचे नांव मावळते अध्यक्ष श्री राजेंद्र लकडे यांनी सुचविले त्यास संचालिका सौ रंजना तवटे यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदी श्री सदानंद राजकुमार हत्तरकी यांचे नांव संचालक श्री वैभव निळकंठ सावर्डेकर यांनी सुचविले. त्यास संचालक श्री राजेंद्र कल्लेश माळी यांनी अनुमोदन दिले.



नुतन अध्यक्षांनी त्यांचे भाषणात बँकेच्या सध्या १०५५ कोटींच्या ठेवी असून ६६७ कोटीची कर्जे, १२२ कोटीचा स्वनिधी, 0% एनपीट, १६ एटीएम, ३० शाखा असा विस्तार असून येणा-या आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय २००० कोटी पार करणे, बँकेला शेडयुल्ड दर्जा प्राप्त करणे, शाखा विस्तार व्यवसाय वाढवणे, ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा देणे. श्री अनिल मल्लय्या स्वामी इचलकरंजी येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते असुन २०१० पासुन बँकेचे संचालक म्हणुन काम करित आहेत. श्री स्वामी यांनी २०२१-२२ उपाध्यक्ष पदाची कारकिर्दीत बँकेस रु. १००० कोटी ठेवी पूर्ण करून देऊन बँकेस उच्चांकी नफा मिळवून दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -