ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाने सुचवलेल्या नावांपैकी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही गट येथून पुढे याच नावाने ओळखले जातील आणि याच नावाने ते निवडणुकीला समोरे जाणार आहेत.
ठाकरे गटाला मिळाले हे चिन्ह
दरम्यान निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी तीन-तीन निवडणूक चिन्हांची शिफारस केली होती. त्यापैकी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे, तर शिंदे गटाला चिन्हासाठी इतर पर्याय सुचवावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला पत्र लिहून ही माहिती दिली आहे. दोन्ही पक्षांनी चिन्हांसाठी सुचवलेले ‘त्रिशूल’, ‘उगवता सूर्य’ आणि शिंदे गटाने सुचवलेलं ‘गदा’ हे पर्याय निवडणूक आयोगाच्या ‘फ्री चिन्हांच्या यादी’त नसल्यामुळे ते देण्यास आयोगाने नकार दिला आहे. यामुळे शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळाले नाही.
मोठी बातमी! शिवसेनेच्या दोन्ही गटांना नावं जाहीर, ठाकरे गटाला मिळालं हे निवडणूक चिन्ह
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -