ताजी बातमी ऑनलाईन टीम
बिग बींनी आज वयाच्या 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बंगल्या बाहेर गर्दी केली. अमिताभ बच्चन मध्यरात्री त्यांच्या ‘जलसा’ बंगल्यामधून बाहेर पडले. चाहत्यांनी जल्लोष करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच केक कटींग देखील केली. मध्यरात्री चाहते हे महानायकाच्या बंगल्या बाहेर जमले होते. चाहत्यांना पाहून बिग बी (Big B) देखील आनंदीत झाल्याचे दिसले. त्यांनी हात जोडून चाहत्यांना शुभेच्छा देखील दिल्या. थोडा वेळानंतर ते पुन्हा परत गेले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी श्वेता बच्चन देखील होती.
आज कुटुंबियांसोबत असणार केबीसीमध्ये
पत्नी जया बच्चन आणि लाडका लेक अभिषेक बच्चन यांच्यासह बिग बी आज केबीसीच्या स्टेजवर पोहोचून लोकांना एक खास सरप्राईज देणार आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांमध्ये रमताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन हे आतापर्यंत स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसले आहेत, मात्र आता शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि मेगास्टारची पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत. हा खास एपिसोड पाहण्यासाठी चाहते देखील आतूर झाले आहेत.