ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयसीसी टी-20 विश्वचषकाला फक्त काही दिवस बाकी आहेत. भारतीय संघ आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर 2022 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारताचा 15 सदस्यीय टी-20 संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडले आहेत.
16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. हे सामने पहिल्या क्वालिफायर फेरीत होणार आहेत. सुपर 12 टप्प्यातील सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होतील. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. जाणून घेऊया विश्वचषकातील भारताच्या सामन्यांचे आणि सुपर 12 समान्यांचे वेळापत्रक.









