ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली कोल्हापूर रस्त्यावर अतिग्रे तालुका हातकणंगले येथे राज धब्यासमोर कोल्हापूर दिशेने जणारी एसटी बस नंबर mh १३ cu ७३६८ पलटी झाली. हा अपघात सकाळी ९:०० वाजता झाला. गाडीतील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. एस टी चे अंदाजे १,५०,००० रू चे नुकसान झाले आहे. अपघात पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.
सध्या सांगली कोल्हापूर रस्त्यावर डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे तेथे बरिकेट्स लावले होते. वाहतूक एकेरी दिशेने चालू होती. अपघाताची फिर्याद एस टी चालक राजेंद्र मोहन वणवे, वय ३२ यांनी हातकणंगले पोलिसात दिली. त्या नंतर थोड्याच वेळात त्याच ठिकाणी कोल्हापूर दिशेने जाणारा ट्रक नंबर MH १४ DM ७८९१ ला पाठीमागून येणाऱ्या लक्झरी बस नंबर AP ३९ V ६१३९ ने जोराची धडक दिली. बस चा पुढील भाग मशीन सहीत आत गेला होता. सुदैवाने बस मध्ये कोणीही प्रवाशी न्हवते. चालक संगमेश्वर पुदनपुरे वय ४२ रा हैदराबाद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक ची कोणतीही चुकी नसल्यामुळे पोलिसांच्या मध्यस्तीने बस चालकाकडून नुकसान भरपाई घेण्यात आली. ट्रक चालक सूरज दिलावर मुजावर वय २४ रा कोथळी याने हातकणंगले पोलिसात फिर्याद दिली आहे. आज सकाळी १५ मिनिटाच्या अंतरावर हे दोन अपघात झाल्यामुळे २-३ तास वाहतूक व्यवस्था कोलमडली. धब्यासमोरील डीवायडर बेकायदेशीरपणे तोडून टाकला आहे. सार्वजनिक बांधाकाम विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. सातत्याने ह्या ठिकाणी मोठे अपघात घडून अनेकांचे प्राण गेलेले आहेत. या ठिकाणी डीवायडर घालून रस्ता सुरक्षित करावा अशी तीव्र मागणी असतानाही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. ह्या अपघातांचा तपास मा. पो. निरिक्षक के एन पाटील यांचे आदेशाने पो. ना. २१२३ कांबळे करत आहेत.




