Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जिल्ह्यात पंधरा दिवसांत आढळले नवे 64 कुष्ठरूग्ण, 222 क्षयरूग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात पंधरा दिवसांत आढळले नवे 64 कुष्ठरूग्ण, 222 क्षयरूग्ण

जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान सक्रीय क्षयरूग्ण, कुष्ठरूग्ण शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतून जिल्ह्यात 64 नवे कुष्ठरूग्ण, 222 नवे क्षयरूग्ण दिसून आले. या रूग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. शोधमोहिमेत दुप्पट रूग्ण आढळत असतील तर अशी तपासणी मोहीम क्षय, कुष्ठरूग्ण नियंत्रणासाठी नियमित राबवणे गरजेचे बनले आहे.

केंद्राच्यावतीने प्रतिवर्षी कुष्ठ, क्षयरूग्ण शोध मोहीम राबवली जाते. कोरोना काळात ती थांबली होती, यंदा 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान, सक्रीय क्षय, कुष्ठरूग्ण शोधमोहीम राबवण्यात आली. मोहिमेत कुष्ठ, क्षयरूग्णांचे निदानापासून वंचित रूग्णांचा शोध घेणे, त्यांच्यावर औषधोपचार सुरू करणे हा उद्देश होता. मोहिमेपुर्वी यातील बरेचसे रूग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याचे, डॉक्टरांकडे जाणे टाळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातूनच जिल्ह्यात ही शोध मोहीम व्यापक पातळीवर राबवण्यात आली.

साडेचौदा हजार संशयित रूग्णांत 222 नवे क्षयरूग्ण

जिल्ह्यात 31 लाख 29 हजार 329 लोकसंख्या निवडली. त्यात 14 हजार 503 संशयित क्षयरूग्ण आढळले. त्यापैकी 222 क्षयरूग्ण हे नवे असल्याचे जिल्हा क्षयरोग केंद्राच्या निदर्शनास आले आहे. आरोग्य पथकाने घरोघरी भेट देऊन संशयित रूग्णांची तपासणी केली. या मोहिमेत 5 हजारांवर कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी दिली.

12 हजार संशयित रूग्णांत 64 नवे कुष्ठरूग्ण

कुष्ठरूग्ण शोध मोहिमेत 31 लाख 44 हजार इतकी लोकसंख्या तपासणीसाठी निश्चित केली. त्यामध्ये 12 हजार 733 संशयित कुष्ठरूग आढळले. त्यात 64 नवे रूग्ण आढळले आहेत. दोन वर्षांपुर्वी ही संख्या 28 इतकी होती, ती वाढली आहे. नव्या रूग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर उपचार सुरू केल्याची माहिती जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.
रूग्ण शोध मोहीम सातत्याने राबवणे आवश्यक – डॉ. दु. पांडे

रूग्ण शोध मोहीम सातत्याने राबवणे आवश्यक – डॉ. दुर्गादास पांडे

आरोग्य उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे म्हणाले, कुष्ठ, क्षयरूग्ण शोध मोहिमेत 15 दिवसांत अनुक्रमे 222 क्षय आणि 64 नवे कुष्ठरूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात अशा मोहीम सातत्याने राबवणे आवश्यक बनले आहे. कुष्ठरूग्णांत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर नियमित अशा रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -