Sunday, August 3, 2025
Homeक्रीडाक्रिकेटपटू Shikhar Dhawan ची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘डबल एक्सेल' मधून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन!

क्रिकेटपटू Shikhar Dhawan ची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘डबल एक्सेल’ मधून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन!

टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार आहे. क्रिकेटविश्वात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा शिखर धवन आता मनोरंजन विश्वात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी देखील सज्ज झाला आहे. शिखर धवन ‘डबल एक्सेल’ या चित्रपटातून (Double XL Movie) शिखर धवन अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात शिखर धवन हा अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या डबल एक्सेल चित्रपटात आता शिखर धवनची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे शिखरच्या चाहत्यांना कमालीची आनंद झाला आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये कमलीची उत्सुकता आहे. शिखर धवनने मैदान गाजवले आता चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये सर्वांना शिखर धवनची झलक पाहायला मिळाली. शिखर धवन यामध्ये जरा हटक्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

महत्वाचे म्हणजे, शिखर धवन त्याचे मूळ नाव आणि ओळखीसह या चित्रपटात दिसणार असल्याचे प्रोमोमधये दिसत आहे. पण शिखरची या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणू भूमिका आहे की तो महत्वाच्या भूमिकेत आहे हे अद्याप कळू शकले नाही आणि निर्मात्यांनी देखील याबाबत सस्पेंन्स ठेवला आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग भारत आणि यूकेमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रामानी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -