महागाईने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. सणासुदीच्या काळात दुधाचे दर (Milk Hike) वाढले आहेत. अमूलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने दिल्लीत आपल्या दुधाच्या किमतीत (Amul Price Hike) 2 रुपयांनी वाढ केली आहे. आज सकाळी लोक दूध घेण्यासाठी बाहेर पडले असता, अमूल दुधाच्या एका किलोच्या पाकिटावर 61 रुपयांऐवजी 63 रुपये लिहिलेले पाहून त्यांना धक्काच बसला. अमूलने फुल क्रीम दुधाची किंमत (Amul Full Cream Milk Price) 61 रुपयांवरून 63 रुपये प्रति लिटर केली आहे. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. अमूलनंतर आता इतर कंपन्याही या सणासुदीच्या काळात दुधाच्या दरात वाढ करू शकतात.
यापूर्वीही वाढल्या होत्या किंमती
याआधीही 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. नवीन दरानुसार, अमूल शक्ती दूध 50 रुपये प्रतिलिटर, अमूल गोल्ड 62 रुपये आणि अमूल ताझा 56 रुपये प्रति लिटर दराने मिळत होते.
चारा महाग होत असल्याने वाढत आहेत किंमती
गेल्या वेळी अमूलने किमती वाढवल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, चाऱ्याचा महागाईदर अजूनही विक्रमी पातळीवर आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या घाऊक महागाईच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. घाऊक महागाईच्या आकडेवारीनुसार चाऱ्याचा महागाई दर 25 टक्क्यांच्या वर राहिला आहे. चारा महागल्याने दूध उत्पादन खर्च वाढत आहे. पशुपालकांचा नफा कमी होत आहे.
या कंपन्यांनीही वाढवले होते दूर
या आठवड्यात दोन कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. या आठवड्यात 11 ऑक्टोबर रोजी मेधा आणि सुधा डेअरीने दुधाच्या दरात वाढ जाहीर केली होती. या दोन्ही कंपन्यांचे दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महागले आहे. मदर डेअरीनेही ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात वाढ केली होती. मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू आहेत. याआधी मार्चमध्येही मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली होती.