जगातील महान भविष्यवेत्त्यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा नास्त्रेदमस यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. फ्रान्सचा (France) जगविख्यात भविष्यवेत्ता म्हणून नास्त्रेदमस यांची ओळख होती. नास्त्रेदमस यांनी (Nostradamus) शतकांपूर्वी आपल्या प्रोफेसीज या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाणी (Future predictions) केल्या आहे. नास्त्रेदमसने 1566 मध्ये मृत्यूपूर्वी या 6,338 भविष्यवाणी लिहिल्या आहेत. यात जगाचा अंत कधी आणि कसा होईल हेही सांगितले आहे. 2023 संदर्भात देखील नास्त्रेदमस यांनी भविष्यवाणी केली असून यात त्यांनी 5 अंदाज व्यक्त केले आहे. जे ऐकून कोणालाही धक्का बेसल.
हिटलरच्या उद्यापासून ते शेवटपर्यंत जपानवरील अणुबॉम्बस्फोट, सेलिब्रिटी डायनाचा मृत्यू, 9/11 चा हल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचे भाकीत बऱ्याचप्रमाणात खरे ठरले आहे. अशात नास्त्रेदमस यांनी 2023 संदर्भात हादरवणारे असे 5 भाकीत केले असून जाणून घेऊया त्या विषयी….
मंगळ ग्रहाबाबत मोठं भाकीत
नास्त्रेदमसने मंगळाबाबतही भाकीत केले आहे. नास्त्रेदमसने असे लिहिले आहे की, ‘मंगळावर प्रकाश पडत आहे’, बरेच लोक या ओळीचा अर्थ लावत नास्त्रेदमसने मंगळावर मानवाच्या आगमनाविषयी भविष्यवाणी केली आहे, असं मानत आहे. या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये मानवाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश मिळू शकते. विशेष म्हणजे रशिया, चीन, अमेरिका आणि भारत हे चार देश मानवाला मंगळावर पोहोचवण्यासाठी वेगाने काम करत आहेत. अशा स्थितीत 2023 मध्ये या दिशेने काही मोठा विकास होण्याची शक्यता आहे.
पोप बदलणार
पोप बदलणे हे देखील नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीपैकी एक आहे. असे झाल्यास पोप फ्रान्सिस यांच्या जागी दुसरे कोणीतरी येईल. नास्त्रेदमसच्या मते, पोप फ्रान्सिस हे शेवटचे खरे पोप असतील. त्यांची जागा जो घेईल तो मोठा घोटाळा करेल.
तिसरे महायुद्ध
नास्त्रेदमसने प्रोफेसीज या पुस्तकात लिहिले आहे की, ‘सात महिने महान युद्ध आणि वाईट कृत्यांमुळे लोकांचा मृत्यू’, अनेकजण या ओळीचा अर्थ तिसऱ्या महायुद्धाशी जोडत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर काही लोक या ओळीचा अर्थ चीन आणि तैवानमधील संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपाशी जोडत आहे. तर अमेरिका आणि उत्तर कोरिया किंवा अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढता संघर्ष तिसऱ्या महायुद्धाचे संकेत मानल्यास 2023 मध्ये ही भविष्यवाणी खरी ठरू शकते, असे काहींचे मत आहे.
आकाशातील आग
प्रोफेसीज या पुस्तकात लिहिलेल्या, ‘एका शाही इमारतीवर आकाशातील आग’ या ओळीचा अर्थ लावताना अनेक जण याकडे एका नवीन सभ्यतेच्या जन्माचा दुवा म्हणून पाहत आहे. तर काही जाणकार याकडे राजा किंवा महान राष्ट्रप्रमुखासाठी संभाव्य मोठा धोका म्हणून पाहत आहेत.
दोन शक्तींची होणार युती
नास्त्रेदमसने 2023 बद्दल एक महत्त्वाची गोष्ट देखील लिहिली आहे, यात पुढील काही महिन्यांत दोन महान शक्तींची युती होण्याची भविष्यवाणी केली आहे. ही युती एक मजबूत पुरुष आणि कमकुवत पुरुष किंवा महिला नेत्यामध्ये असेल. या युतीचे चांगले परिणाम होतील. मात्र, ही युती लवकरच तुटेल.