सराईत चोरट्यास अटक करून तीन मोटरसायकली जप्त विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यास अटक करून 79700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातून अनेक मोटरसायकल चोरीला जात असल्याच्या फिर्यादी पोलिसात दाखल होत होत्या .
त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चालू केला होता . पोलिसांनी या प्रकरणी मार्केट यार्ड सांगली येथे आरोपी प्रदीप संभाजी उबाळे ,वय 25 वर्षे , राहणार मोरे गल्ली ,गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरलेल्या 3 मोटरसायकली ,रोख रक्कम तसेच एक इलेक्ट्रिक मोटार असा एकूण 79700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे ,पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ माने , विलास मुंढे , दरिबा बंडगर ,संदीप घसते , महम्मद मुलानी ,भावना यादव यांच्या पथकाने सदरची कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला .