सासूने सूनेकडे अंघोळीसाठी गरम पाणी मागितले असता सुनेने सासूच्या अंगावर उकळतं पाणी ओतल्यामुळे सासू कांताबाई नारायण मोहिते (वय- 60) रा. लक्ष्मी नारायण कॉलनी उजळाईवाडी (ता. करवीर) मूळ गाव भंबेरी (ता. खटाव) जि. सातारा ह्या भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता त्याचा दहा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. सासूच्या मृत्यूस कारणीभूत सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सपोनि अविनाश माने करीत आहेत.
याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.२१ सप्टेंबर २२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सासू कांताबाई नारायण मोहिते यांनी सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्याकडे अंघोळी करीता गरम पाणी मागितले. याचा राग आलेल्या सून राधिका मोहिते हिने गरम पाण्याची बादली सासू कांताबाई हिचे अंगावर ओतल्याने त्या भाजून जखमी झाल्या होत्या. त्याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
उपचार सुरू असताना त्याचा 30-सप्टेंबर 22रोजी मृत्यू झाला. या अकस्मात मृत्यूबद्दल दि.10 ऑक्टोबर रोजी नातू ओंकार श्रीरंग मोहिते याच्या सह नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे दि.१६ ऑक्टोबर रोजी सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.
तर राधिका मोहिते हया सन 2012 पासून स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असून त्यांचेवर सातारा, कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. अशी माहिती नातेवाईक यांनी दिली. याबाबत कांताबाईचा नातू ओंकार श्रीरंग मोहिते याच्या तक्रारी नुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि अविनाश माने व पोलीस नाईक सकपाळ हे करीत आहेत.