Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी !

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी !

कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल आज दिवसभरात स्पष्ट होणार आहे, त्यापूर्वी भुदरगड तालुक्यातील फये गावातील ग्रामपंचायतीचा निकाल जवळपास हाती आला आहे. या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच शिंदे गटाचे खाते खोलले असून सरपंच पदाच्या उमेदवार नकुशी धुरे विजयी झाल्या आहेत.

फये ग्रामपंचायत मधील सात पैकी तीन जागांवर शिंदे आणि भाजप गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असल्या तरी सरपंच पदाच्या उमेदवारावर शिंदे आणि भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. प्रामुख्याने या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट -भाजप यांच्यात लढत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -