Monday, July 7, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदे गटातील शहाजीबापू पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण! म्हणाले, झाडी, डोंगर आता भरपूर...

शिंदे गटातील शहाजीबापू पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण! म्हणाले, झाडी, डोंगर आता भरपूर झालं, आता…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला असताना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांची ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल… ओकेमध्ये हाय…’, अशी ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे या एका डायलॉगमुळे आमदार पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माझं झाडी, डोंगार भरपूर झालं, आत मला मला विधान परिषदेवर घ्या, अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील हे संबोधित करत होते. यावेळी या कार्यक्रमाला भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे देखील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील (Abhjit Patil) यांना सांगोल्यातून आमदार करा. माझं झाडी डोंगार भरपूर झालं आहे. आता मला विधान परिषदेवर घ्या, अशी जाहीर मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.

नांदेडमध्ये गेलो की गर्दी होते. कोकणात गेलो तरी गर्दी होते. त्यामुळे यामुळे मला देखील तुमच्यासारखं विधानपरिषेदवर घ्या. पण अभिजित पाटील यांना सांगोल्यात भाजपकडून उमेदवारी द्या, असे आमदार पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाहीत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शहाजीबापू यांची विधानपरिषदेसाठी फिल्डिंग…

शहाजीबापू पाटील यांनी सन 2019 मध्ये सांगोला विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शहाजीबापू यांनी शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. पण आगामी निवडणुकीत आमदार पाटील यांना शेकापचं मोठं आव्हान असणार आहे, त्यामुळे ते विधानसभेऐवजी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं…

आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर (SSUBT) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं. त्यांचा माझ्यावरच जास्त राग होता, असं सांगत आमदार पाटील यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आगामी निवडणुकीत दोन्ही राऊतांचा पराभव अटळ असल्याचा दावा देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -