सांगली शहरासह उपनगरातील संजयनगर ,चिंतामणीनगर , धनशामनगर, कलानगर, शामरावनगर, विश्रामनगर आदी भागातील मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाकी गेल्या सहा महिन्यापासून स्वच्छ केलेले नाहीत व नदीला गडूळ पाणी असल्याने सांगली शहरात सह महापालिका क्षेत्रात गडूळ पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
सांगली शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे .आणि गढूळ पाणी पुरवठा होत आहे. पाण्याला उग्र असा वास येत आहे.गेल्या आठ दिवसापासून नदीला गडूळ पाणीपुरवठा येत असल्याने ते पाणी डायरेक्ट फिल्टर न होता सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे .त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. सांगली शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नॅशनल फोरम अध्यक्ष वसीम नायकवडी यांनी महापालिका वर आंदोलन काढू असा इशारा यावेळी दिला आहे.