मारहाणीत बेळगांव चा तरुण गंभीर जखमी
मिरज स्टेशन चौकामध्ये देवदर्शन घेऊन परत आलेल्या एका प्रवाशाला नशेखोर आणि मद्यपी तरुणांने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. यामध्ये सुरेश देवजी काटकर राहणार आंबेवाडी जिल्हा बेळगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. हकीकत अशी की बेळगावहून पंढरपूर या ठिकाणी सुरेश देवजी काटकर हे देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते देवदर्शन झाल्यानंतर ते परत आपल्या गावी आंबेवाडी ला जाणार होते ते मिरज स्टेशनला उतरले असता नाष्टा सेंटर मध्ये नाश्ता करत असताना नशेखोरानी त्यांचे पाकीट मारले त्यानंतर त्यांचा वादवाद चालू असताना अज्ञात नशेखोर आणि मध्यपी तरुणांने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचे डोके फोडून गंभीर जखमी केले.
या आधी सुद्धा अशा प्रकारचे नशेखोरानी अनेक प्रवाशांवर हल्ले केलेले आहेत या नशेखोराना पोलिसांचा चाप कधी बसणार असा सवाल नागरिकांतून होत आहे. याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा ही सवाल नागरिकांकडून होत आहे. याआधीही नशेखोरांकडून प्रवाशांना लुटमारीचे आणि मारहाणीचे प्रकार घडले आहेत पुन्हा असेच प्रकार मिरजेत घडत आहेत याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.