Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रपावसाचं थैमान, दगडूशेठ मंदिरातही शिरले पाणी; आजही मुसळधार पावसाची शक्यता!

पावसाचं थैमान, दगडूशेठ मंदिरातही शिरले पाणी; आजही मुसळधार पावसाची शक्यता!

परतीचा पाऊस (Rain Updates) राज्यभरात बसरत आहे. पुण्यातही (Pune News) पावसाने चांगलीच बॅटिंग केली. सोमवारी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाच्या (Pune rain) सरी बसरल्या. शहरामध्ये तर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी शिरले. साडे नऊ वाजेच्या सुमारास धुव्वादार पाऊस सुरु झाला होता. यामुळे रस्त्यांनाही नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागांतील तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला.

पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ हलवाई मंदिरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु होते. यासोबतच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टला देखील फटका बसला. येथील संग्रहालयामध्ये देखील पाणी शिरले. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

शहरतील रेल्वेस्टेशनमध्ये कंबरेएवढं पाणी
शहरातील रेल्वे स्टेशनमध्येही पाणी शिरल्याचं पाहायला मिळाले. या ठिकाणी कर्मचारी आणि प्रवासी हे कंबरे एवढ्या पाण्यातून चालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुनच पुण्यात रात्रीच्या सुमरासात पडलेला पाऊस किती जोरदार होता याचा अंदाज येत आहे.

पुणे शहरासोबत जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने चांगलं झोडपून काढलं. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या परतीच्या पावसामुळे खराब झाले आहेत. या नुकसानामुळे शेतकरी हादरला आहे, त्यांची चिंता वाढली आहे. यामुळे आता प्रशासनाने योग्य ती मदत करावी अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

पुण्यात आजही जोरदार पावसाची हजेरी
पुण्यामध्ये आजरी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र आता 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यामध्ये वीजेच्या कडकडाचासह मुसळधार पाऊस बसरणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आद्रता वाढत आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यासोबतच राज्यातील दक्षिणेमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -