Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरऐन दिवाळीत गोकुळची दूध खरेदी, विक्री दरात वाढ

ऐन दिवाळीत गोकुळची दूध खरेदी, विक्री दरात वाढ

दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली आहे. म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रूपये तर गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 वाढ करण्यात आली आहे. एकीकडे दूध उत्पादकांना दिवाळी भेट देणाऱ्या गोकुळने विक्री दरातही वाढ केली आहे. म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर 3 रूपये वाढ केली असून येत्या शुक्रवार 21ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.विक्री दरातील वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आता महिन्याला प्रतिलिटरमागे 90रूपये मोजावे लागणार आहेत.गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दूध खरेदी आणि विक्री दरातील वाढीची माहिती दिली.संचालक मंडळाच्या बैठकीत या वाढीसंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले की, गोकुळमधील सत्तांतरानंतर आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने गेल्या दीड वर्षात सलग सहाव्यांदा ही दरवाढ केली आहे. सध्या म्हैस दूध खरेदी दर प्रतिलिटर 45 रुपये 50 पैसे आहे. यामध्ये दोन रुपयांची वाढ करून खरेदी दर प्रतिलिटर 47 रुपये 50 पैसे करण्यात आला आहे. तर गाय दूधालाही सध्या प्रतिलिटर 32 रुपयांमध्ये 3 रुपयांची वाढ देण्यात आली असून खरेदी दर प्रतिलिटर 35 मागे करण्यात आला आहे.

कोल्हापूरसह मुंबई,पुण्यात विक्री दरात वाढ

दूध विक्री मध्ये मुंबई व पुणे येथे सध्या प्रतिलिटर 66 रुपये दर आहे. यामध्ये 3 रुपयांची वाढ करून प्रतिलिटर 69 रुपये करण्यात आला आहे. या दोन्ही शहरात अर्धा लिटरला 33 रुपये दर होता. यामध्ये 2 रुपयांची वाढ करून 35 रुपये करण्यात आला आहे. तर कोल्हापूरमध्ये सध्या प्रतिलिटर 60 असलेल्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ करून प्रतिलिटर 63 रुपये तर आर्धा लिटरसाठी असलेल्या 30 रुपयांमध्ये 2 रुपयांची वाढ करून प्रतिलिटर 32 रुपये करण्यात आला आहे.

गोकुळ दूधाचे नवीन दर (प्रति लिटर)

दूध प्रकार पूर्वीचा खरेदी दर नवीन खरेदी दर म्हैस दूध 45 रुपये 50 पैसे 47 रुपये 50 पैसे गाय दूध 32 रूपये 35 रूपये

दूध प्रकार पूर्वीचा विक्री दर नवीन विक्री दर म्हैस दूध 60 रूपये 63 रूपये (1 लिटर) म्हैस दूध 30 रूपये 32 रूपये (अर्धा लिटर) (या दोन्ही दर वाढी कोल्हापूरसाठी आहेत.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -