कुंडल पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत मोटार सायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपीची माहिती घेत असताना, तपास पथकातील संकेत कानडे, कुबरे खोत यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुंडल पोलीस ठाणे कडील गुन्हयातील चोरी झालेली चारचाकी वाहन मुस्तफा काझी रा. रुकडी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर याने चोरलेली आहे. तो रुकडी ता. हातकणंगले येथे घरी राहणेस असल्याबाबत बातमीदारमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. बातमीप्रमाणे मुस्तफा काझी याचे घराचे अलीकडे जावुन वॉच करत असताना बातमीप्रमाणे एक इसम नजर ठेवत असलेल्या घरातुन बाहेर येताना दिसला.
तसा त्या बातमीप्रमाणे तोच असल्याचे खात्री झालेने त्यास पोलीस उपनिरीक्षक विशाल रेळेकर व पथकाने ताबेत घेऊन यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुस्तफा अकबर काझी वय ३८ वर्षे रा.गणेश मंदीर, रुकडी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर असे सांगितले, मुस्तफा काझी यास आय २० एम एच ०९ ई के ५६९२ या गाडी बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदरची गाडी ही खड़ीभाग कुंडल येथून दि.१६. जुन २०२२ रोजी रात्री ०८.०० वा.चे. सुमारास साथीदारसह चोरी केली असल्याचे सागितले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी मुस्तफा काझी याचे घराजवळुन ३ लाख रु. हुंडाई कंपनीची आय २० वाहन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल पुढील गुन्हयाचे तपास कामी कुंडल पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास कुंडल पोलीस ठाणे करीत आहे.




