ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शिवाजी पुल ते रजपुतवाडी गावापर्यंत ठीक ठिकाणी रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात घडले असून प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आल्याचे चित्र असून हा मार्ग म्हणजे कोणत्याही क्षणी प्रवाशांना जणू यमदूत मार्गच ठरतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान शिवाजी पुल आंबेवाडी आणि रजपुतवाडी येथील खड्यांमुळे गेल्या महिनाभरात सुमारे २१ लहान मोठे अपघात झाले आहेत.
या स्थितीबाबत संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांना नागरिक व प्रवाशांनी सूचना माहिती देऊन देखील महामार्गाचे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान रजपूत वाडी येथे गेल्या पंधरा दिवसात खड्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अखेर स्थानिक नागरिकांनी महापालिकेची उपलब्ध बॅरिकेट्स निम्म्या रस्त्यावर लावून रस्त्यामध्ये असणारे खड्डे प्रवाशांच्या लक्षात यावेत याकरिता प्रयत्न केले आहेत दरम्यान सोमवारी रजपुतवाडी ग्रामस्थांनी व पत्रकारांनी या स्थितीबाबत या महामार्गावर सध्या देखरेख करणारे महामार्ग अधिकारी व्ही एन पाटील यांना फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही सोय लावण्यात त्यांनी असमर्थता दर्शवून उद्धट उत्तरे देत फोन कट केला ग्रामस्थांना दिली त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी बॅरिकेट्स लावून महामार्ग अधिकाऱ्याचा निषेध केला यामुळे वाहनधारकांची अधिकच कोंडी आणि वाहनधारकांना तितकाच धोका वाढला आहे