Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीबाबो, दिवाळी नंतर कुरुंदवाडात तब्बल ८ लाखांचे मटण-चिकन, मासे विक्री

बाबो, दिवाळी नंतर कुरुंदवाडात तब्बल ८ लाखांचे मटण-चिकन, मासे विक्री

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दिवाळी सण येऊन गेल्यानंतर आता सगळे बाहेर जेवणासाठी निघत असताना आपल्या समोर नवीन बातमी समोर आलेले आहे कुरुंदवाड मध्ये तब्बल आठ लाखाचे चिकन मटण विक्री झाल्याचे दिसून येत आहे तर गेली चार दिवस दिवाळी सण सुरू असल्याने
पाडव्याच्या दिवशी घरोघरी मांसाहारी जेवणाचा बेत आखला आहे. त्यासाठी मटन मार्केटात एकच झुंबड उडाली होती. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्रीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोडधोड मिष्टान्नामुळे तोंडाला आलेली बाभळी घालवण्यासाठी मटन व तांबड्या रस्स्यावर ताव मारला जातो. दरम्यान, खवय्यांनी दिवसभरात तब्बल 8 लाख रुपयांचे मटण, चिकन, मासे फस्त करत मांसाहारवर ताव मारला. 1 .100 हून अधिक बोकडे, दीड हजार कोंबड्या तर मासे असे एकूण 2 हजार किलोपेक्षा अधिक मटणाची विक्री झाली.



मांसहारी खवय्यांनी आज सकाळपासून मटण, मासळी, चिकन दुकानावर गर्दी केली होती. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी खवय्यांच्या दुकानाबाहेर लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मासळी, चिकनच्या तुलनेत मटणाला अधिक मागणी होती. त्याखालोखाल चिकनला ही चांगली मागणी होती. मासळी बाजारात खोल समुद्र, खाडी, नदीतील तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळीची आवक झाली. तर नदीचे कल्याप, आयर, वाम्ब आणि कनशी आदी माशांची मोठी विक्री झाली.

जवळपास 100 बोकडाच्या 800 किलो मटणाची जवळपास 600 रुपये किलो प्रमाणे 4 लाख 80 हजार रुपयांच्या मटणाची विक्री झाली. सुमारे 1400 कोंबड्याच्या 1 हजार किलो चिकनची 220 रुपये किलो प्रमाणे 2 लाख 20 हजाराच्या चिकनची विक्री झाली. तर 400 किलो मासे विक्री झाले आहेत.
माशांचे दर गगनाला भिडले आहेत. सुरमई मासे 700 रुपये किलो, बांगडा 250 रुपये किलो, किलेप 150 रुपये किलो, मरळ 300 रुपये, वैशोडा 150 रुपये तर कटरना 180 रुपये किलो असे दर होते. एकीकडे महागाईमुळे नागरिकांनी आखडता हात घेतला असला तरी मटण, चिकन खरेदीसाठी थोडा हात सैल सोडला.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -