Sunday, July 27, 2025
HomeमनोरंजनSai Tamhankar चा बोल्ड अंदाज! मॅगझिनसाठी केले बिकिनी फोटोशूट, फोटो शेअर करत...

Sai Tamhankar चा बोल्ड अंदाज! मॅगझिनसाठी केले बिकिनी फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाली…

मराठी चित्रपटसृष्टीची बोल्ड आणि तितकीच बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर चांगलीच चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच सई ताम्हणकरने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. आपल्या अभिनयाने ती प्रेक्षकांची मनं जिंकते तसंच ती आपल्या फोटोशूटच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांची मनं जिंकले. नुकताच सई ताम्हणकरने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरु आहे.

सई ताम्हणकर तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सईने नुकताच ‘वुमन फिटनेस’ या मॅगझिनसाठी हे बिकिनी फोटोशूट केले आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लावण्यात आलेल्या सईच्या ब्लॅक कलरच्या बिकिनीतील हॉट फोटोने सर्वांचे लक्षे वेधून घेतले आहे. सईने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

सई ताम्हणकरने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘बुम…फिटनेस हा माझ्यासाठी नेहमीच अवघड पण तेवढाच प्रभावी असा प्रवास राहिलेला आहे. माझ्या मते चिकाटी आणि सातत्य हे प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे. मी अजूनही या दोन्ही गोष्टींमध्ये सर्वोत्तम होण्यासाठी धडपड करत आहे. ‘वुमन फिटनेस’ मॅगझिनच्या कव्हर पेजवर फोटो झळकल्यामुळे मला कायम शारीरिक सुदृढता जपण्याची ताकद मिळाली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.’ आपल्या पोस्टमध्ये या सर्व गोष्टी सांगत सईने आपल्या चाहत्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे.

दरम्यान, सई ताम्हणकर याआधी आपल्या चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आली होती. तिने ‘हंटर’, ‘पुणे 52’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन देत चाहत्यांना धक्का दिला होता. या चित्रपटांमुळे सईची जोरदार चर्चा झाली होती. सई मराठी चित्रपटसृष्टीतील बिधनास्त अभिनेत्री आहे. आता सईने मासिकासाठी केलेल्या बोल्ड बिकिनी फोटोशूटमुळे तिची चर्चा होत आहे. सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -