Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : मणेराजुरीत एका रात्रीत तीन घरफोड्या

सांगली : मणेराजुरीत एका रात्रीत तीन घरफोड्या

मणेराजूरीत बुधवारी एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून यामध्ये सुमारे पाच ते साडेपाच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. गुरुवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान या चोऱ्या झाल्या आहेत. तासगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मणेराजूरीत एका रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला असून विठ्ठल मंदीराजवळ ओढ्याकाठी राहणाऱ्या किराणा व्यापारी मारुती तानाजी बिले यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीची कडी काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व तिजोरी तसेच लाकडी कपाट उघडून दहातोळे सोने, सुमारे 80 हजार रुपये रोख चोरट्यांनी पळविले. तर घरातील छोट्या पर्स त्यांनी घरापासून जवळ असलेल्या बागेत टाकल्या.

तसेच कळशी व तांब्या ओढयात फेकून दिला. सकाळी उठल्यांनतर बिले कुटुंबियांना हा प्रकार समजला. ‘तर दुसरा प्रकार सरकारी दवाखान्याजवळील तानाजी चव्हाण यांच्या घराची कडी काढून महागडा मोबाईल चोरून नेला. त्याचबरोबर चोरट्यांनी दवाखान्यासमोरील हिंदूराव बाबूराव जमदाडे यांच्या घरासमोर लावलेली होंडा सप्लेंडर गाडी चोरली. या घटनेने परिसरात घबराट व भीतीचे वातावरण आहे. चोरीच्या या प्रकारावरून या पारध्यांनी चोऱ्या केल्याचा पोलीसांना संशय आहे.

या घटनेची वर्दी पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगाव पोलीसात दिली असून घटनास्थळी पीएसआय नामदेव तारडे, संदीप गुरव, पोलीस कॉस्टेबल रमेश कुंभार, मंडले, यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. तसेच घटनास्थळाचे ठसेही घेण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -