कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिग्लज तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.
अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि.04) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती गडहिग्लज पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात बाप लेकाचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली जात होती.
गडहिग्लज तालुक्यातील तुपूरवाडी येथील शेतात दोघांचा खून करण्यात आला. यामध्ये केंचाप्पा मारुती हारके (वय 37, रा. जोडकुरळी, ता. रायबाग, जि. बेळगाव) याच्यासह त्याचा मुलगा शंकर केंचाप्पा हारके (4) या पिता-पुत्राचा निर्घृण खून करण्यात आला. अचानक घटना घडल्याने मारेकरी नेमके कोण यावर शंका घेतली जात आहे. परिसरातली काही मेंढपाळांनी पळ काढल्याने पोलिसांचे शोधकार्य त्या दिशेने सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी थांबून तपास वेगाने करण्यात प्रयत्न सुरू केले आहेत.