आज विराट कोहलीचा 34 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी विराट कोहलीला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. कालपासून विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटचे चाहते एकदम खूश आहेत.
पाकिस्ताचा गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर भारतीय चाहत्यांचं त्याने मनं जिंकलं आहे. विराटला शुभेच्छा द्यायला उशिर का करायचा ? विराटने क्रिकेटला चांगले दिवस आणले अशा हटके शुभेच्छा शहनवाज दहानी याने दिल्या आहेत.
विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर #HappyBirthdayViratKohli, #ViratKohliBirthdayCDP, #ViratKohli या हॅशटॅग द्वारे चाहते शुभेच्छा देत आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीकडून उर्वरीत सामन्यात चांगली कामगिरी व्हावी अशा देखील शुभेच्छा चाहते देत आहेत.