Monday, February 24, 2025
Homeराजकीय घडामोडीमहाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक ;चंद्रकांत पाटील यांची माहिती

महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक ;चंद्रकांत पाटील यांची माहिती

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या राज्यपालांची शुक्रवारी कोल्हापुरात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जे मुद्दे पुढे आले, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. सीमाप्रश्नाबाबत असलेल्या खटल्याचा निर्णय न्यायालयात होईल, मात्र या दोन्ही राज्यात असणारी कटुता दूर करण्यासाठी शुक्रवारी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची महत्वपूर्ण बैठक झाल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

मंत्री पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सीमाप्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यावर न्यायालय निर्णय देईल. तोडगा काढेल. तो पर्यंत मात्र सीमा भागातील मराठी बांधवांना त्यांचे नागरी हक्क दिले पाहीजेत. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये. दोन्ही राज्याच्यांमधील कटुता दूर व्हावी. या बाबतची सकारात्मक चर्चा राज्यपालांच्या बैठकीत झाली असावी. तसेच बैठकीतील अंमलबजावणीच्या पातळीवरचे जे मुद्दे आहेत. त्याबद्दल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होईल.

75 हजार युवक, युवतींना शासकीय नोकरी देणार राज्य सरकारने चार ठिकाणी रोजगार मेळावे घेतले. यामध्ये 2100 जणांना नियुक्ती पत्रे दिली. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवामध्ये 75 हजार युवक, युवतींना शासकीय नोकरी देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. पुढील आठ दिवसांत पोलीस आणि ग्रामविकास विभागातील प्रत्येकी 20 हजार पदे भरली जाणार आहेत. प्राध्यापकांची रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 2088 प्राध्यापकांची भरती झाली आहे. याचा आढावा घेऊन पुढील भरती प्रक्रिया राबवली जाईल. याशिवाय ग्रंथालय, प्रयोगशाळा कर्मचायांची भरती प्रक्रियाही राबवली जाणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -