नव्या ठिकाणी प्रवास करताना अनेकदा तुम्ही रस्ता चुकला असाल. त्यावेळी लोकांना विचारण्याआधी तूम्ही गुगलला (Google) विचारले असेल. गुगलनेही अगदी योग्य ठिकाणी तूम्हाला पोहोचवले असेल.पण. आता ही सेवा तूम्हाला वापरता येणार नाही. कारण, गुगलने काही अॅप्स बंद केले आहेत. त्यामध्ये योग्य रस्ता दाखवणाऱ्या अॅप्सचाही समावेश आहे.
गुगल केवळ सर्च इंजिन म्हणूनच काम करत नाही. तर या गुगलने अनेक स्मार्टफोन अॅप्सही तयार केले आहेत. त्यामधील काही अॅप्स गुगलने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आम्ही गुगल मॅप (Google Maps) नाही तर, गुगल स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) बद्दल बोलत आहोत.
योग्य मार्ग दाखवण्यात गुगल स्ट्रीटही मदत करत होते. पण, कंपनीने ते अॅप आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल स्ट्रीट हे गुगलचे स्टँडअलोन स्ट्रीट व्ह्यू अॅप आहे. ते येत्या काही दिवसांत अॅप स्टोअरवरून काढून टाकले जाणार आहे.
का बंद होत आहे हे ॲप
काही दिवसांपूर्वीच Google Maps स्ट्रीट व्ह्यूचे फीचर लाँच करण्यात आले होते. पण, याला युजर्सचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2023 पर्यंत गुगल स्ट्रीट व्ह्यू अॅप आयफोन (iPhone) आणि अन्ड्रॉइड (Android) युजर्ससाठी पूर्णपणे बंद होईल.