ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी रविवारी भारताला झिम्बाब्वेचा सामना करावा लागणार आहे. झिम्बाब्वेने याधी पाकिस्तानसारख्या संघाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे भारतीय संघाला परवडणार नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा रविवारी मेलबर्नमध्ये ग्रुप-2 च्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध 5-2 असा करिअर रेकॉर्ड आहे. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांनी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. त्यानंतर यंदाच्या टी-20 विश्वचषकात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.
भारतीय संघाला या मैदनावर खेळण्याचा अनुभव आहे. दोन आठवड्यांपूर्वी यांच मेलबर्नच्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडिया पुन्हा या मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे झिम्बाब्वेचा संघ सकारात्मक पद्धतीने मैदानात उतरेल. अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा झिम्बाब्वेच्या दमदार कामगिरीचं बलस्थान आहे. याशिवाय कर्णधार क्रेग इर्विन, शान विल्यम्स, वेस्ली माधवेरे आणि रायन बर्ले यांच्याकडूनही संघाला चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल. हा सामना खूपच चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध 5-2 असा करिअर रेकॉर्ड आहे. या फॉरमॅटमध्ये त्यांचा शेवटचा सामना 2016 मध्ये झाला होता आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये ते पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवले आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेला हलक्यात घेणे टीम इंडियाला परवाडणार नाही. झिम्बाब्वेने पर्थमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक धावांनी धक्कादायक विजय मिळवला. त्यामुळे या सामन्यात भारत सुरुवातीपासूनच सावधगिरीने खेळेल.