Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानMaruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

मारुती सुझुकी (Maruti Suzuki Cars) आपल्या काही ठराविक मॉडेल्सवर 57 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे मिळू शकतात. चला आज आपण पाहूया कोणत्या गाडीवर नेमका किती डिस्कॉऊंट आहे याबाबत..

Alto K10- (Maruti Suzuki Cars)
मारुती सुजूकीने काही दिवसांपूर्वीच लॉंच केलेल्या Alto K10 साठी 57,000 रुपयांची ऑफर आहेत. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच Alto K10 च्या व्हेरिएन्टवर एकूण 22,000 रुपयांची ऑफर आहेत, ज्यामध्ये 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

Maruti Dzire-
मारुती सुजूकी (Maruti Suzuki Cars) आपल्या डिझायरच्या AMT व्हेरिएन्ट वर 32,000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे, ज्यामध्ये रु. 15,000 कॅशबॅक, रु. 7,000 कॉर्पोरेट फायदे आणि रु. 10,000 एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. त्याच वेळी, डिझायरच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वेरिएंटवर 17,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Wagon R-
कंपनी ग्राहकांना Wagon R च्या ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएन्ट वर 41,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामध्ये रु. 20,000 कॅशबॅक, रु. 6,000 कॉर्पोरेट फायदे आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज (Maruti Suzuki Cars) बोनस मिळेल. Wagon R च्या मॅन्युअल व्हेरियंट LXi आणि VXi वर 31,000 रुपयांची सूट दिली जात आहे, तर त्याच्या AMT व्हेरिएंटवर 21,000 रुपये आणि CNG व्हेरिएंटवर 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Celerio –
मारुती सुझुकी Celerio च्या मिड-स्पेक VXi मॅन्युअल वेरिएंटवर 56,000 रुपयांची सूट देत आहे. ज्यामध्ये 6,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 35,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय कंपनी Celerio च्या LXi, ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरियंटवर 41,000 रुपयांची सूट देत आहे.

Maruti S-Presso-
मारुती सुझुकीच्या एस प्रेसो मॅन्युअल व्हेरिएंटवर जवळपास 56,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये रु. 35,000 कॅशबॅक, रु. 6,000 कॉर्पोरेट फायदे आणि रु. 15,000 एक्सचेंज बोनस समाविष्ट आहेत. तसेच कंपनी S Presso च्या AMT वेरिएंटवर 46,000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय S Presso CNG व्हेरिएन्ट वर 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये 20,000 रुपये कॅशबॅक आणि 15,000 रुपये एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -