Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाटीम नेदरलँडने केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव, टीम इंडिया पोहचली सेमी फायनलमध्ये!

टीम नेदरलँडने केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव, टीम इंडिया पोहचली सेमी फायनलमध्ये!

ताजी बातमी ऑनलाईन टीम


आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम नेदरलँड्सने टीम दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक घेतली. टी 20 वर्ल्ड कप 2022 चा 40 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात एडलेड ओव्हल मैदानावर रंगला होता. या सामन्यात नेदरलँड्सने दमदार कामगिरी करत 13 धावांनी दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. नेदरलँडच्या या विजयानंतर टी 20 वर्ल्ड स्पर्धेतील सर्व समीकरणं बदलली. नेदरलँडच्या टीमचा टी 20 वर्ल्डमधील प्रवेश निश्चित झाला तर दुसरीकडे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे.



टी 20 वर्ल्ड कपमधील 40 वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम बॅटिंग करताना टीम नेदरलँडने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 158 धावा केल्या आणि टीम दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य मिळाले. 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य गाठू शकली नाही आणि 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकली. या सामन्यात टीम दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला

या पराभवामुळे टीम दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. टीम आफ्रिकेने पाच सामन्यांमध्ये फक्त पाच गुण मिळवले आहेत. त्यामुळे टीम आफ्रिकेचा रनरेट +0.864 वर घसरला. टीम आफ्रिकेचा पराभव झाल्यामुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम आफ्रिकेच्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झालाच पण त्यासोबत याचा फायदा पाकिस्तान आणि बांगलादेशला होऊ शकतो. या टीममध्ये होणाऱ्या पुढच्या सामन्यातील विजेत्याला सेमी फायनलमध्ये स्थान मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -