Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनआलिया-रणबीर झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म!

आलिया-रणबीर झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. आलियाने आज गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नुकताच गिरगावच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाने बाळाला जन्म दिला. आलिया-रणबीरला कन्यारत्न झाल्यामुळे सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे. घरामध्ये चिमुकलीचे आगमन झाल्यामुळे कपूर आणि भट्ट कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाने आलिया आणि रणबीरला खूपच आनंद झाला आहे. आज सकाळी आलिया भट्ट डिलिव्हरीसाठी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. यावेळी आलिया भट्टसोबत रणबीर कपूर देखील उपस्थित होता. काही तासांमध्येच आलियाने बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीर आई-बाबा झाल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. आता सर्वांना प्रतिक्षा लागली आहे ती म्हणजे बाळाची पहिली झलक पाहण्याची. त्याचसोबत दोघेही बाळाचे नाव काय ठेवणार हे देखील जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

आलिया भट्ट्ने बाळाच्या जन्मानंतर मॅटरनिटी लिव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आपल्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. मॅटरनिटी लिव्हवर जाण्यासाठी आलियाने आगामी चित्रपटांचे शूटिंग देखील पूर्ण केले आहे. दरम्यान, लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलियाने प्रग्नेंट असल्याचे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्रीने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला होता. 14 एप्रिलला आलिया आणि रणबीरचे लग्न झाले होते. लग्नाला सात महिने पूर्ण होण्यापूर्वीच आलियाने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -