Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

धक्कादायक : वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा खून (killed) केला आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत तरुणाचे नाव प्रणव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. प्रणव हा इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हि हत्या (killed) करण्यात आली. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसला होता. यादरम्यान वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आला. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले.

यानंतर या टोळक्याने प्रणव आणि त्याच्या मित्रांचा पाठलाग केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू (killed) झाला. तर अन्य एक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -