ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवीन आधार कार्ड काढताना किंवा अपडेट करताना, अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात आल्यानंतर ‘युआयडीएआय’ने नागरिकांच्या मदतीसाठी खास ‘आधार मित्र’ चॅटबाॅट सुरु केलं आहे.
आधार कार्डची सद्यस्थिती जाणून घेणे, पीव्हीसी कार्ड, आधार केंद्र, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंकिंग आदी कामासाठी ‘युआयडीएआय’शी संपर्क साधावा लागतो. मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरं चॅटबॉटच्या माध्यमातून ‘आधार मित्र’ देईल.
नागरिकांना तक्रार नोंदवण्याचीही सुविधा मिळेल. त्या तक्रारींचा मागोवा घेता येईल. तक्रारीवर काय कारवाई झाली, याचीही माहिती मिळेल.
‘आधार मित्र’ कसे वापरायचे?
‘आधार मित्र’ हे चॅटबॉट वापरण्यासाठी ‘युआयडीएआय’च्या संकेतस्थळावर जावे लागेल.
तेथे मुख्य पृष्ठावर ‘आस्क आधार’ असा निळा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करताच, ‘आधार मित्र’ ही सुविधा वापरता येईल.
तेथे तुमचे प्रश्न किंवा तक्रार मांडली, की चॅटबॉद्वारे लगेच त्याची उत्तरे दिली जातील.
‘आधार मित्र’ हे हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.