ताजी बातमी ऑनलाईन टीम
परतीच्या पावसाने शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. त्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या सरकारचे मुख्यमंत्र्यांना गणेशोस्तव काळात गल्लीत नवरात्र उत्सव काळात दांडिया खेळायला वेळ आहे परंतु या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळात नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही. त्यामुळेच हा नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत आहे त्याच्या मागे केलेल्या मागणीकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहेत त्यामुळेच या सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हा रास्ता रोको केला असून पंधरा दिवसात नुकसान भरपाई दिली नाही. तर पंधरा दिवसात पूर्वसूचना न देता आंदोलन करण्याचा इशारा देऊन कायदा व्यवस्थेचा प्रश्नाला सरकार जबाबदार असणार असल्याचा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सत्तार नाहीतर गद्दार आहेत. या कृषी मंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही. ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या या कृषिमंत्र्याला जाब विचारण्याचा इशारा देऊन खोके सरकारने पंधरा दिवसात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथापूर्व सूचना न देता उग्र आंदोलन छेडण्यात येईल.
या रास्ता रोको वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळालेच पाहिजेत घरासाठी २५,००० मिळालेच पाहिजे शेतमजुरांना २५ किलो मोफत धान्य मिळालेच पाहिजे या मागणीचे निवेदन अरुण भाई दुधवडकर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांनी हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे व सपोनि सागर पाटील यांना दिले.
लेखी निवेदनाद्वारे तुमच्या मागण्या सरकार पर्यंत पाठविण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले नंतर हा मोर्चा हा रस्ता रोके मागे घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. खोके सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणा आणि बॅनर घेऊन शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी या आंदोलनामुळे कोल्हापूर सांगली महामार्गावर दुतर्फावाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी सपोनी सागर पाटील निलेश कांबळे यांच्यासह पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.